पेट्रोल भरायला गेलो तरी तिथं मोदींचा फोटो असतो, अजित पवारांची मिश्किल टीका !

पुणे : देशात पाच राज्याच्या निवडणूक पार पडल्यानंतर पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेल दरवाढीची झालं असामान्य नागरिकांना सोसावी लागत आहे. याच मुद्द्यावरून आता राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. पुण्यात कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. अजित पवारांना कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोबद्दल विचारणा करण्यात आली होती.

यावर अजित पवारांनी आपल्या शैलीत उत्तर दिलं. ‘जाऊ द्या आता त्याला काय, पेट्रोल भरायला गेला तरी तिथेही त्यांचाच फोटो असतो. आता करता करणार काय? तिथे फोटो याच्यासाठी असेल की, १०० रुपये लिटरने तुम्ही पेट्रोल भरताहेत, तर त्यांच्या साक्षीने आपण भरतोय.’ असा टोला अजित अपवारांनाही पंतप्रधान नरेंद्र मोदींना शेलक्या शब्दात लगावला होता. आज वाढत्या पेट्रोल दरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत याच मुद्द्यावर त्यांनी टीका केली आहे.

पुढे तुमच्या प्रमाणपत्रावरही त्यांचा फोटो असेल का? असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला होता. त्यावर अजित पवार म्हणाले, ‘मी काय वेगळा लागून गेलोय का? तुमच्या-माझ्यासहित सर्वच नागरिकांच्या प्रमाणपत्रावर असणार. ते लोकशाही मार्गाने निवडून आलेले आहेत म्हणून त्यांनी ते आणलंय. त्याची पब्लिसिटी किती करावी? आम्ही प्रमाणपत्र देताना कुणाचेही फोटो. तसलं काही नाही केलेलं. माणसांना यातून कसं बाहेर काढता येईल, असा विचार केला पाहिजे, असेही पवार म्हणाले.

Team Global News Marathi: