अशोक चव्हाण यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केलेल्या टीकेला भाजपा आमदार राम कदम यांचे सडेतोड उत्तर !

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मंत्री असो चव्हाण यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु झाले आहे. त्यात अशोक चव्हाण यांनी पाटील यांच्या टीकेला प्रतिउत्तर दिले आहे. “प्रचंड ताणतणावामुळे आ. चंद्रकांत पाटील सैरभैर झाले आहेत. नेमके काय बोलावे हे कळेनासे झाल्याने शब्द निवडताना सतत त्यांचा तोल सुटतो आहे. पण योग्य मानसिक उपचारातून या समस्येवर नक्कीच मार्ग निघू शकेल, अशी मला अपेक्षा आहे” अशी टीका चव्हाण यांनी केली होती.

आता अशोक चव्हाण यांनी चंद्रकांत पातळ्यांवर केलेल्या टिकेला आमदार राम कदम यांनी ट्विट करून उत्तर दिले आहे. ते आपल्या ट्विट मध्ये म्हणतात की, आपल्या मंत्रिमंडळातील सदस्य अशोक चव्हाण यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर मानसिक उपचारांची गरज आहे, हे त्यांचे विधान चंद्रकांत दादांचा अपमान करणारे नसून त्यांनी ज्या मराठा समाजासाठी 3 हजार कोटींची मागणी केली त्या मराठा समाजाचे संतुलन बिघडले असे म्हणणे अर्थात मराठा समाजाला वेडा म्हणण्या पर्यंत मजल जाणे दुर्दैवी आहे

चंद्रकांत पाटील यांनी मराठा समाजासाठी पॅकेज मागितले तर त्यावर अशी प्रतिक्रिया व्यक्त करणे हा मराठा समाजाचा अपमान आहे. तुमच्या सरकारच्या निष्काळजीपणामुळे व चुकांमुळे मराठा समाजाने असलेले आरक्षण गमावले. आता पॅकेज मागितले तर अपमान करता ! दादांनी मागणी केल्याप्रमाणे मराठा समाजासाठी ताबडतोब पॅकेज जाहीर करा. आपण या विषयात असेच मौन पाळले तर मराठा समाजाचा अपमान करण्याला आपली मूक संमती आहे, असे मराठा समाज समजेल असे त्यांनी म्हंटले आहे.

 

Team Global News Marathi: