“आजीने आणलेली आणीबाणीही चुकीची होती हे राहुल गांधी यांनी आता मान्य केले आहे – चंद्रकांत पाटील

मुंबई : काँग्रेसचे माजी अध्यक्ष व नेते राहुल गांधी यांनी आणीबाणी संदर्भात केलेल्या विधानावर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. त्यात आता भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना टोला लगावला आहे.

या संदर्भात चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करून टोला लगावला आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, आजीने आणलेली आणीबाणीही चुकीची होती हे राहुल गांधी यांनी आता मान्य केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी ज्या चुकीच्या, तथ्यहीन आणि तिरस्करणीय टिप्पण्या केल्या होत्या, त्याबद्दल त्यांनी त्वरित माफी मागावी. नाहीतर काही वर्षानंतर याचीही जाणीव त्यांना होईल आणि मग माफी मागितली जाईल, पण नंतर देशातील जनता त्यांना माफ करणार नाही. राहुल गांधी माफी मागता मागता थकून जातील पण त्यांच्या गुन्ह्यांची मोजणी संपणार नाही. असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटलें आहे.

पुढे ते अजून एक ट्विट करून म्हणतात की, “आणीबाणीच्या काळात ज्या लोकांचे जीव गेले, त्यांनी ज्या प्रकारे लोकशाहीची हत्या केली… ते माफ करण्यासारखे आहे का? इंदिरा गांधी यांना जो जो कोणी विरोध करेल त्या लाखो लोकांना जेलमध्ये टाकले जायचे,लाखोंचे संसार उध्वस्त झाले. हजारो लोक जेलमध्येच मेले.” असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

Team Global News Marathi: