बाळासाहेब थोरातांचं नाव घेतलं नव्हतं, त्यांनी मनाला का लावून घेतलं

 

नगर |  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून तसेच राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केल्यानंतर मंत्री बाळासाहेब थोरात आणि त्यांच्या वाद होत असल्याचे चित्र दिसून आले होते. त्यातच एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी नाव न घेता थोरात यांच्यावर टीका केली होती या टीकेला थोरात यांनी सुद्धा प्रतिउत्तर दिले होते. यावेरूनच आता विखे पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

बाळासाहेब थोरात निराश का वाटतात हे मला कळत नाही. मी त्यांचे नाव घेतले नव्हते , त्यांनी का मनाला लावून घेतले हे कळाले नाही. निराश होण्यापेक्षा त्यांनी जाहीरपणे सांगावे की त्यांनी बदलीत पैसे घेतले नाही , व्यवहारात , स्टँम्प डयुटीत पैसे घेतले नाही किंवा त्यांचे कोणतेही ‌कार्यकर्ते वाळू धंद्यात नाहीत, हे थोरातांनी जाहिरपणे सांगावे.

तसेच पुढे बोलताना विखे पाटील म्हणाले की, मी जे बोललो ते थोरातांच्या मनाला लागलेले दिसते.चौकशी सुरू आहे त्यात समोर येईलच.मला नैराश्य नाही मात्र माझ्या वक्तव्याने थोरात का निराश झाले हा प्रश्न पडला असल्याचे विखे पाटील म्हणाले. आता या टीकेला थोरात काय प्रतिउत्तर देतायत हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: