“इतक्या खालच्या पातळीवर जाऊन आमच्या बापाबद्दल लिहू शकत नाही,”

 

अभिनेत्री केतकी चितळे हीनं आपल्या फेसबुक अकाऊंटवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टवर अनेक स्तरांतून निरनिराळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. तर अनेकांनी यावर संतापही व्यक्त केला आहे. दरम्यान, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीदेखील यावर भाष्य केलं.

आव्हाड म्हणतायत की, “अशा गोष्टींमुळे सर्व स्तरांमध्ये चिड निर्माण होते. समजाता वेगवेगळ्या ठिकाणी काम करणाऱ्यांमध्ये चिड निर्माण होते. जे आमच्या भगिनीनं लिहिलंय ते वाचवतही नाही. त्यांना कदाचित माहित नसेल शरद पवार यांचे तीन ऑपरेशन झाले आहेत. त्यातून ते बाहेर आलेत.

आज आजारी असताना सुद्धा अशा परिस्थितीतही ते गावखेड्यात शेतात जातात, सभा घेतात. ते देखील ८३ व्या वर्षी. त्यांच्या पत्नीही वाचत असतील ना या सर्व गोष्टी, मुलगीही पाहत असेल. त्यांना हृदय नाही का, आपलं असं काहीच नाही का?,” असा सवाल गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला. अभिनेत्री केतकी चितळे हीच्या वादग्रस्त फेसबुक पोस्टवर बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

“ते मनानं खुप मोठे आहेत. तुम्ही अतिशय खालच्या पातळीवर जाऊन आमच्या बापाबद्दल लिहू शकत नाही. त्यांची लाळ गळतेय, त्यांना नरक मिळालं पाहिजे, ८३ वर्षीय वृद्ध व्यक्तीला तुम्ही असं बोलू शकत नाही. कोणाच्या व्यंगावर आजारावर टीका करायची नाही हे आपल्याला महाराष्ट्र धर्मानंच शिकवलं आहे,” असंही ते म्हणाले.

Team Global News Marathi: