ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या ट्विटवर संजय राऊतांची तिखट प्रतिक्रीया

 

मुंबई | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाले असले तरी तीन विभिन्न विचारसरणीचे पक्ष एकत्र आलेले असले तरी अनेक विषयांवर यांच्यात मतभिन्नता आढळून आलेली आहे. त्यातच याच मुद्द्यावरून वाद झालेले शुद्ध अनेकदा दिसून आले आहे. त्यातच काँग्रेस नेते आणि ऊर्जांमनातरी यांनी वीर सावरकर यांच्या विषयी केलेल्या ट्विटमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल नितीन राऊत यांनी आक्षेपार्ह ट्विट केलं होतं. त्या ट्विटनंतर नितीन राऊत यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकेचा वर्षाव होत असताना पाहायला मिळाला. या सर्व प्रकरणानंतर उर्जामंत्री नितीन राऊत यांनी आपलं ट्विट डिलीट केलं. यावर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.

संजय राऊत यांनी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर सुर्याचं तेज त्याला जाळून टाकेल, अशा तिखट शब्दात आपली प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडीमधील नेत्यांची धूसफूस या ना त्या कारणाने समोर येत असताना पाहायला मिळत आहे. माकड आपला वंशज आहे आणि त्याला वंशज माणलंच पाहिजे, असं यावेळी संजय राऊतांनी बोलून दाखवलं.

 

Team Global News Marathi: