एकनाथ शिंदे यांची केंद्रीय मंत्री अमित शाहंशी फोनवर चर्चा, केली ही मागणी ?

 

मुंबई | शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. आपल्याकडे ४० हून अधिक आमदार असल्याचा दावा शिंदे करत असल्याने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील मविआ सरकार धोक्यात आले आहे. अशातच उद्धव ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेगटाची शिवसेना असा वाद रंगला असून दोन्ही बाजूंकडून कायदेशीर प्रकिया सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी फोनवर चर्चा केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

काय झाली चर्चा? शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची फोनवर चर्चा झाल्याची माहिती खात्रीशीर सुत्रांनी दिली आहे. बंडखोर आमदारांच्या कार्यालयांवर होणाऱ्या हल्लानंतर आता अशा आमदारांना केंद्रीय सुरक्षा देण्याविषयी चर्चा झाल्याचे समजते आहे. मात्र, बंडखोर आमदारांना केंद्रीय सुरक्षा मिळण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळेच गुवाहाटीचा मुक्काम वाढल्याचे सांगण्यात येत आहे.

सरकार स्थापन होईपर्यंत केंद्रीय सुरक्षा पुरवण्याची रणनीती आखली जात आहे. बंडखोर आमदारांची उद्धव ठाकरे सरकार पाडण्याची प्लॅनिंग सुरू आहे. त्यामुळे सरकारचा पाठिंबा काढून घेण्याविषयी कायदेविषयक बारकावे तपासण्यासाठी कायदेतज्ञ टीम काम करत आहे. दरम्यान, बंडखोर आमदारांची परत फिरण्याची मानसिकता दिसत नसल्याचेही सुत्रांनी सांगितले आहे.

Team Global News Marathi: