एकनाथ शिंदे घेणार राजभवनाकडे धाव, राजभवन दरबारी निघणार तोडगा ?

 

शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडाचा आज पाचवा दिवस उजाडला आहे. शिवसेनेनं कारवाईची तयारी सुरू केल्यामुळे शिंदेंच्या गोटात खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांनी तातडीने बैठक बोलावली आहे. विशेष म्हणजे, राज्यपाल कोश्यारी आज राजभवनावर दाखल होणार आहे. त्यामुळे शिंदेंच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. एकनाथ शिंदे हे गेल्या पाच दिवसांपासून 38 आमदारांना घेऊन गुवाहाटीमध्ये मुक्कामी आहे.

आज दुपारी १२ च्या सुमारास एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये ज्येष्ठ विधिज्ञ आणि आमदारांमध्ये विचार -विनामे होणार आहे. विधानसभा उपाध्यक्षाकडून गटनेता आणि प्रतोद नियुक्तीचा निर्णय न झाल्यामुळे ही बैठक बोलावण्यात आली आहे. त्यामुळे आता गटनेता नियुक्तीचा वाद हा आता राज्यपालांकडे जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. राज्यपालांनी कोरोनावर आता मात केली आहे. उपचाराअंती आता राज्यपाल कोश्यारी यांची प्रकृती उत्तम आहे. राज्यपालांना आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास डिस्चार्ज देण्याची शक्यता आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर राज्यपाल हे राजभवनावर जाणार आहे. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून राज्यपाल राजभवनावर नसल्यामुळे राजकीय घडामोडींचा वेग मंदावला होता. आता राज्यपाल राजभवनावर पोहोचल्यामुळे एकनाथ शिंदे गट सक्रिय होईल

Team Global News Marathi: