शेती-मातीत रमणारे एकनाथ शिंदे, महाबळेश्वरच्या पायथ्याशी असलेल्या दरे गावात स्ट्राॅबेरीची शेती

शेती-मातीत रमणारे एकनाथ शिंदे, महाबळेश्वरच्या पायथ्याशी असलेल्या दरे गावात स्ट्राॅबेरीची शेती

सातारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शेतीची आवड आहे. ठाणे जिल्हा आणि राज्याच्या राजकारणात दबदबा असणारा हा नेत्याने आजही शेती आणि मातीशी नाते तोडले नाही. ते नेहमीच वेळात वेळ काढत ते आपली शेती करण्याची आवड जपत असतात.

ते आपल्या सातारा जिल्ह्यातील मूळगावी दरे तर्फ तांब (ता. महाबळेश्वर) या ठिकाणी भात आणि स्ट्राॅबेरीच्या शेतीच्या कामात हातभार लावत असतात. (Eknath Shinde: Eknath Shinde, who enjoys farming, cultivates strawberries in Dare village at the foothills of Mahabaleshwar.)

सध्या राज्यात राजकिय उलथापालथी सुरु असून महाविकास आघाडी सरकार कोसळले. शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे यांना भाजपने पाठिंबा देऊन मुख्यमंत्री पदावर बसवले.

राज्याच्या राजकारणात दबदबा निर्माण करणारे एकनाथ शिंदे हे अनेक वर्षांपासून ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी या शहरी विधानसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व करतात. पण त्यांची आज शेतीची आवड कमी झाली नाही.

राजकारण आणि समाजकारणातून वेळात वेळ काढून ते आपली शेतीची आवड जपतात. त्यांचे मूळगाव सातारा जिल्ह्यातील दरे आहे. तेथे त्यांची घर आणि शेती आहे. त्या शेतीमध्ये ते भात आणि स्ट्राॅबेरीचे उत्पादन घेतात.

दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर ते सुपूत्र खा. श्रीकांत शिंदे आणि कुटुंबासह गावात येतात. तेथे एकनाथ शिंदे हे स्वतः गुडघाभर चिखलात भात लावणी करतात. नुकतेच त्यांचे शेतात राबतानाचे फोटो व्हायरल होत असतात.

ग्लोबल न्युज नेटवर्क: