एकनाथ शिंदेंपाठोपाठ देवेंद्र फडणवीस सर्व कार्यक्रम रद्द, दिल्लीला रवाना !

 

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थकले आहे. त्यामुळे शिंदेंनी सर्व कार्यक्रम रद्द केले आहे. त्यांच्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपले सर्व कार्यक्रम रद्द केले असून नवी दिल्लीला रवाना झाले आहे. आज सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना आणि शिंदे गटावर सुनावणी पार पडली. यावेळी सुनावणी हे ८ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराच्या तयारीत असलेल्या शिंदे सरकारचा सर्व कार्यक्रम खोळंबला. एकनाथ शिंदे यांनी आपले सर्व कार्यक्रमांना स्थगिती दिली.

त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहे. देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीसाठी रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. आज देवेंद्र फडणवीस दिल्लीत पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर दरम्यान, शिवसेना कुणाची या वादावर सुप्रीम कोर्टामध्ये आजची सुनावणी पूर्ण झाली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने कोणताही निर्णय दिला नाही. यावेळी शिवसेनेच्या चिन्हाबद्दल कोणताही निर्णय़ घेऊ नका, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहे. तसंच, दोन्ही गटांच्या लिखित युक्तिवादावर निर्णय घेतला जाईल, असंही कोर्टाने स्पष्ट केलं. त्यामुळे पाच न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे निर्णय जाणार की नाही, याबद्दल सोमवारी निर्णय होण्याची शक्यता आहे.

Team Global News Marathi: