भाजपा नेते प्रसाद लाड यांच्या टीकेला एकनाथ खडसे यांचे प्रतिउत्तर

भाजपा नेते प्रसाद लाड यांच्या टीकेला एकनाथ खडसे यांचे प्रतिउत्तर

भाजपा सोडल्यानंतर आता एकनाथ खडसे यांचा उलट प्रवास सुरु झाला आहे. स्वत:चं अस्तित्व दाखवण्यासाठी त्यांची तडफड सुरु आहे. त्यांना काय करायचे ते करू दे, अशी टीका आमदार प्रसाद लाड यांनी राष्ट्रवादीचे नेते खडसे यांच्यावर केली होती. आता लाड यांच्या टीकेला खडसे यांनी जर्दार प्रतिउत्तर दिले आहे.

माझ्या मुलीचा पराभव करण्यासाठी पक्षविरोधी काम करण्यात आले. भाजपच्या पदाधिकार्यांचा आतूनच ही जागा पाडण्यासाठी पाठिंबा होता. जनतेने मला सलग सहा वेळा निवडून दिले, प्रसाद लाड यांनी जनतेमधून किमान एकदा तरी निवडून येऊन दाखवावे असे खुले आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिले आहे.

पुढे बोलताना खडसे म्हणालेत की, मी भाजमधून गेल्याचा परिणाम होत नसेल, तर भाजपचे पदाधिकारी वारंवार एकनाथ खडसे गेल्यावर परिणाम होणार नाही असे का म्हणतात? माझे नाव वारंवार का घेत आहेत? असा सवाल एकनाथ खडसे यांनी विचारला. उत्तर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची ताकद कमी झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी पूर्वीपेक्षा कमी आमदार निवडून आले आहेत, असे खडसे म्हणाले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: