एकनाथ खडसेंनी भाजपमध्ये अनेक वर्ष राहून मनोरंजनच केलं

 

मुंबई | भाजपा नेते आणि मंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीचे अनेक आमदार आपल्या संपर्कात असल्याचे म्हटले होते. यावरच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दानवे यांना लक्ष करत हे केवळ मनोरंजन असून दानवे स्वप्न पाहत असल्याचे ते म्हणाले होते. आता यावरच दानवे यांनी खडसे यांना प्रत्युत्तर दिले आहे.

मंत्री दानवे म्हणाले आहेत की, ”एकनाथराव खडसे यांनी भाजपमध्ये अनेक वर्ष राहून मनोरंजनच केले आहे. एकनाथ खडसे यांच्या कल्पनेत असतील काही मनोरंजन करणारे नेते. पण भाजपचे नेते हे कामे करणारे आहेत. मनोरंजन करणारे नाहीत.” रावसाहेब दानवे यांची गिरीष महाजन यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्यास हजेरी लावली. यानंतर माध्यमांशी बोलताना ते असे म्हणाले आहेत.

यावेळी महाविकास आघाडी सरकारला इशारा देत ते म्हणाले आहेत की, आणखी चार प्रेन ड्राईव्ह बॉम्ब बाहेर येणार आहेत. विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हान यांची फॉरणसिक चाचणी करण्यात यावी. तसेच त्यांना कठोर शासन करणयात यावे. काहीतरी सत्य दडलय म्हणूनच तर त्यांनी राजीनामा दिला, असं देखील ते म्हणाले आहेत.

Team Global News Marathi: