एकनाथ खडसेंना ईडीने नोटीस बजावली की होतो कोरोना – गिरीश महाजन

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे आणि भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांचयातील वाढ सर्वश्रुत आहे. त्यात कोरोना संसर्गावरून या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर जोरदार आरोप लगावले आहेत.

माझा कोरोना हा ईडीचा कोरोना नसून ईडीच्या तारखा पाहून माजी मंत्री एकनाथ खडसेंना कोरोना होतो, अशी टीका आमदार गिरीश महाजन यांनी केली. तसेच शासकीय रुग्णालयात माझ्यासह कुटुंबाने उपचार घेतल्याचेही महाजन यांनी या वेळी सांगितले. ते पाटकर मद्यमांशी बोलत होते.

पुढे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मला एकदाच कोरोना झाला. मला ईडीच्या तारखा पाहून कोरोना होत नाही. माजी मंत्री एकनाथ खडसे यांना ईडीने नोटीस बजावली की कोरोना होतो. ते खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे सांगतात आणि मुंबईला फिरतात. माझ्या संपूर्ण कुटुंबाला बाधा झाली होती व आम्ही सरकारी रुग्णालयात उपचार घेतले. खोटे बोलणे अन् तशी कागदपत्रे सादर करणे, तसले काम आम्ही करत नसल्याचेही गिरीश महाजन यांनी या वेळी सांगितले.

भाजपाच्या २७ नगरसेवकांनी जळगाव महानगर पालिका निवडणूकीत पक्षांतर केले असून या नगरसेवकांवर योग्य ती कारवाई केली जाईल. महापालिकेत मोठा घोडेबाजार झाला असून पैसे देऊन नगरसेवकांना वळवण्यात आले आहे. राज्यात सत्ता असल्याने हा खेळ झाला असल्याचे महाजन यांनी सांगितले.

Team Global News Marathi: