एकनाथ खडसे पुन्हा भाजपात जाणार?; अमित शाह यांच्यासोबत फोनवरून चर्चा

 

भाजपकडून देण्यात येणाऱ्या त्रासाला कंटाळून एकनाथ खडसे पुन्हा भाजपात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.अलीकडेच खडसे अमित शाह यांच्या भेटीसाठी गेले होते परंतु शाह यांच्याशी भेट झाली नाही मात्र फोनवरून दोन्ही नेत्यांची चर्चा झाली. त्यामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात खडसे पुन्हा भाजपात जाणार असल्याचे तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत.

याबाबत भाजपा खासदार रक्षा खडसे म्हणाल्या की, एकनाथ खडसे आणि मी अमित शाह यांच्या भेटीसाठी गेलो होतो परंतु शाह त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे भेटू शकले नाहीत. मात्र फोनवरून चर्चा झाली आहे. चर्चा वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. त्यामुळे मी त्यावर बोलू इच्छित नाही. ज्यांना राजकारण करायचं असेल ते करणारच आहेत. मात्र नाथाभाऊ भाजपात येणार आहेत असं मला माहिती नाही असं त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. अमित शाह हे देशाचे गृहमंत्री आहेत. अमित शाह यांना भेटू नये हे नियम आहेत का? मोदी-शाह यांच्यासोबत विरोधक गोधडीत असल्यापासून माझे संबंध आहेत. मी अमित शाह यांना याआधीही भेटलो. यापुढेही भेटणार आहे. देवेंद्र फडणवीसांनाही भेटणार आहे. म्हणून त्याचा दुसरा अर्थ काढण्याची गरज नाही असं सांगत राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपा प्रवेशाच्या चर्चेचं खंडन केले आहे.

Team Global News Marathi: