डोंबिवलीतील हिंदू गर्व गजर्ना मेळावा हा दसरा मेळाव्याचा ट्रेलर- दादा भुसे

 

न्यायालयाने शिंदे गटाला दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवरील ठिकाण नाकारले आहे. न्यायालयाचा निकाल एका अर्थाने योग्यच लागला असे मला वाटते. कारण नवी मुंबईपाठोपाठ डोंबिवलीतील हिंदू गर्व गजर्ना मेळाव्यातील कार्यकत्र्याची अलोट गर्दी पाहता शिवाजी पार्क पुरले नसते ही गर्दी दसरा मेळाळ्य़ाचा ट्रेलर आहे असे सुकंकः विधान मंत्री दादा भुसे यांनी केले होते.

तसेच दसरा मेळाव्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पार्क पेक्षा पाच पट मोठे मैदान घ्यावे लागेल. मुंबईत मैदान उपलब्ध न झाल्यास दसरा मेळावा ठाण्यात घ्यावा अथवा नाशिकमध्ये मेळाव्या घेण्याची मला संधी द्यावी अशी मागणी बंदरे आणि खणीकर्म मंत्री दादा भुसे यांनी येथे केले. डोंबिवलीतील पाटीदार भवन सभागृहात शिंदे गटाच्या वतीने हिंदू गर्व गजर्ना मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी मंत्री भुसे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अडीच महिन्यात राज्याच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. शेतक:याचा मुलगा मुख्यमंत्री झाल्याने शेतक:यांना न्याय दिला गेला आहे. आज चारच शब्द सारखे ऐकविले जातात. गद्दार, पाठीत खंजीर खुपसला, बाप काढला, खोटारडे. बाळासाहेब माझे वडिल आहेत. त्याचा फोटो का लावला. मात्र मी सांगेन की, बाळासाहेब एका कुटुंबाचे प्रमुख नव्हते. ते संपूर्ण शिवसेनेचे बाप होते. बाप काढणा:यांचे विचार संकुचित आहे अशी टिका भुसे यांनी शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली.

Team Global News Marathi: