‘एक ‘था’….’, अमृता फडणवीस यांचं सूचक ट्वीट मात्र झटक्यात डिलीट

 

मुंबई | राज्यात राजकीय घडामोडींना उत आला असून कधी राजकीय भूकंप होऊन सत्तांतर होईल काही सांगता येत नाही. शिवसेनेचे नेते आहि राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेच्या डोकेदुखीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यातच अनेक आमदारांनी शिंदे यांची साथ दिल्यामुळे महाविकास आघाडी टिकणार की लवकरच कोसळणार अशी शक्यता निर्माण झाली आहे.

अशातच राज्यातील राजकीय समीकरणाबाबत विविध अंदाज बांधले जात आहेत. या दरम्यान विधानसभा विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट केलं. विशेष म्हणजे अमृता फडणवीस यांनी केलेलं ट्विट अवघ्या काही मिनिटांमध्ये डिलीटही केलं. मात्र या ट्विटमुळे पुन्हा एकदा अमृता फडणवीस आणि शिवसेना असा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अमृता फडणवीस ट्विटमध्ये काय?
‘एक ‘था’ कपटी राजा’ असं ट्विट अमृता फडणवीस यांनी 8 वाजून 35 मिनिटांनी केलं होतं. मात्र अवघ्या काही क्षणात त्यांनी हे ट्विट डिलीट केलं. अमृता फडणवीस या सातत्याने राजकीय परिस्थितीवर ट्विट करत असतात. ट्विटच्या माध्यमातून ते आपलं मत मांडत असतात. मात्र आता त्यांनी हे ट्वीट डिलीट केल्याने या ट्विटची चर्चा अधिक रंगली आहे.

Team Global News Marathi: