एक दिवसाला नरेंद्र मोदींच्या खाण्यावर किती होतो खर्च? आरटीआय अधिकाराखाली माहिती उघड

 

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खाण्यावर किती रुपये खर्च करतात? याची माहिती आरटीआय अंतर्गत विचारण्यात आली होती. त्यानंतर आरटीआय अंतर्गत विचारलेल्या प्रश्नावर पंतप्रधान कार्यालयाकडून माहिती देण्यात आली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खाण्यावर किती रुपये खर्च होतो आणि तो खर्च कोण करतं? या प्रश्नांची उत्तरे देण्यात आली आहेत.

आरटीआयला अंतर्गत विचारलेल्या प्रश्नावर पंतप्रधान कार्यालयाचे केंद्रीय अवर सचिव यांनी माहिती दिली आहे. त्यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जेवणावर सरकारी बजेटमधून एक रुपया देखील खर्च केला जात नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उपलब्ध करुन दिल्या जात असलेल्या सर्व सुविधांचा खर्च हा सरकारी बजेटमधून केला जात नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खाण्यावर सरकारी बजेटमधून एकही रुपया खर्च केला जात नाही मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: या खाण्यासाठी होणाऱ्या खर्चाचा भार उचलतात अशी माहिती समोर आली आहे टाटापुर्वी पंतप्रधान मोदी यांच्या राहणीमानावर अनेकदा विरोधकांकडून टीका कारणात आली होती तसेच त्यांच्या विदेशी दौऱ्यावर सुद्धा विरोधकांनी सडकून टीका केली होती.

Team Global News Marathi: