शिक्षणाचा हा अभूतपूर्व घोळ घालणाऱ्या आघाडीला आता विचारावेसे वाटते तुमची “इयत्ता कंची?

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी विरोधक सोडताना दिसून येत नाही. त्यातच आता अकरावी प्रवेशसाठी २१ ऑगस्ट २०२१ रोजी होणारी सीईटी परीक्षा रद्द केली.

राज्य सरकारनं सीईटी संदर्भात २८ मे रोजी एक अध्यादेश काढला होता. तो अध्यादेश हायकोर्टाने रद्द केल्यानंतर भाजप नेत्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. भाजप नेते अ‌ॅड. आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. मुंबई हायकोर्टानं फटकारल्यानं ठाकरे सरकारच्या “छडी लागे छम् छम् विद्या येई घम् घम्”अशा प्रकारची ही चंपी झाली आहे, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.

अकरावीची सीईटी रद्द करताना मा. उच्च न्यायालयाने राज्य सरकारचा हा निर्णय अनियंत्रित, अवास्तव, कठोर, भेदभाव करणारा, लहरी आणि घटनेच्या समानतेच्या हक्काचे उल्लंघन करणारा आहे, अशा कठोर शब्दांत ठाकरे सरकारला फटकारल आहे. “छडी लागे छम् छम् विद्या येई घम् घम्”अशा प्रकारची ही चंपी झालेय, अशी टीका शेलारांनी राज्य सरकार आणि शालेय शिक्षण मंत्रालयालावर केली आहे.

Team Global News Marathi: