‘ईडीच्या भीतीने कुणीही आमच्याकडे किंवा भाजपात येऊ नका’

 

शनिवारपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे औरंगाबाद दौऱ्यावर असून मुख्यमंत्र्यांनी आज औरंगाबादेतून विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे गट हे ईडी आणि इतर तपास यंत्रणांच्या बळाचा वापर करत आहेत, त्यामुळे शिंदे गटात आणि भाजपात अनेक जण सामील होत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. या आरोपाला एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तसेच त्यांनी यावेळी संजय राऊत यांच्यावर ईडीकडून सुरू असलेल्या कारवाईचे देखील समर्थन केले आहे.

शिंदे म्हणाले की, संजय राऊत हे महाविकास आघाडीचे मोठे नेते आहेत, रोज सकाळी ९ वाजता ते प्रसार माध्यमांसमोर येऊन संवाद साधतात. ते आमच्यावर ईडीचा आरोप करत आहेत, पण माझा प्रश्न आहे त्यांना कोणी भाजपमध्ये बोलावलं आहे का? कोणी जर ईडीच्या भीतीने आमच्याकडे येत असेल किंवा भाजपामध्ये जात असेल तर त्यांनी जाऊ नये असे आवाहन मी करतो असं यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

खोतकर असो की कोणीही असो, ईडीच्या कारवाईला घाबरून भिऊन, दडपणाखाली कुणीही असं पुण्याचं काम करू नका. आम्ही एवढं मोठं सरकार बनवलं सगळं झालं. ज्या घडामोडी पाहिल्या त्यात एक तरी सुडाची कारवाई पाहिली का? आमच्यावर ईडीचा दबाव होता म्हणून आम्ही शिंदे गटात गेलो असे आतापर्यंत एका तरी आमदारांनी सांगितले का? अस सवाल एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला आहे.

अर्जुन खोतकरांना मी वाघ समजतोय, तो सुभाष देसाईंसारखा शेळी कधी झाला?

अमित शाहांच्या उपस्थितीत 30 हजार किलोहून अधिक अंमली पदार्थ नष्ट

Team Global News Marathi: