‘अनिल देशमुख, नवाब मलिकांच्या बाजूला शिवथाळी खाण्यासाठी तयार राहा

 

ईडीचं पथक सकाळी सात वाजता संजय राऊत यांच्या घरी दाखल झालेलं आहे. राऊत कुटुंबीयांची सध्या ईडीकडून चौकशी सुरू आहे. ईडीने समन्स बजावूनही राऊत अधिकाऱ्यांसमोर हजर झाले नव्हते. यानंतर ईडीने थेट त्यांच्या घरी जाऊन चौकशी सुरू केली. यावरुन आता भाजपचे आमदार नितेश राणे यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे.

राणे म्हणाले, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या घरी ईडीची अद्यापही चौकशी सुरू आहे. कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. या अगोदरही ईडीच्या तीन वेळा नोटीसा संजय राऊत यांना गेल्या होत्या. मात्र हे महाशय वेगवेगळी कारणं देऊन पळायचे. पळकुट्या व्यक्तींमधील ते एक व्यक्ती आहेत. तुम्ही जर कोणत्याही घोटाळ्यात सहभागी नसाल तर तीन-तीन वेळा ईडीची चौकशी का चुकवता? असा प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थित केला.

पुढे ते म्हणाले, की तुम्हाला जे काही सत्य सांगायचे होतं ते तुम्ही ईडीला जाऊन सांगितलं असतं तर आजची सकाळ खराब झाली नसती. दररोज सकाळी येऊन तुम्ही महाराष्ट्राची सकाळ खराब करायचे, आज तुमची सकाळ खराब झाली आहे. तसेच ईडीचं पथक घरी दाखल होताच संजय राऊत यांनी आपल्या ट्विटरवरुन काही ट्विट केले होते.

यात त्यांनी म्हटलं होतं, की ‘तरीही मी शिवसेना सोडणार नाही. महाराष्ट्र आणि शिवसेना लढत राहील. खोटी कारवाई, खोटे पुरावे.. मी शिवसेना सोडणार नाही. मरेन पण शरण जाणार नाही’. यावरुनही नितेश राणे यांनी राऊतांवर निशाणा साधला.

‘ईडीच्या भीतीने कुणीही आमच्याकडे किंवा भाजपात येऊ नका’

अमित शाहांच्या उपस्थितीत 30 हजार किलोहून अधिक अंमली पदार्थ नष्ट

Team Global News Marathi: