“ईडीचा गैरवापर होतोय, सभागृहात चर्चा व्हावी”,  सेना खासदाराचे राज्यसभा अध्यक्षांना पत्र

मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत चांगलेच अडचणीत आले आहेत. रविवारी सकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत झालेल्या चौकशीनंतर अपेक्षित सहकार्य न करण्याच्या कारणावरून ईडीने संजय राऊत यांना मध्यरात्री अटक केली.

याच पार्श्वभूमीवर आता शिवसेनेकडून संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसून येत आहे. अशातच शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी राज्यसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं आहे. आजच्या सत्रात केंद्रीय यंत्रणांच्या दुरूपयोगावर चर्चा घ्यावी यासाठी प्रियांका पत्र लिहिलं आहे. ईडी, सीबीआय, आयटीचा देशात दुरूपयोग होत असल्याचा आरोप प्रियंका चतुर्वेदी यांनी केला आहे.

इतर विषय सस्पेंड करून यंत्रणांच्या दुरुपयोगावर चर्चा करण्याची मागणी त्यांनी पत्राच्या माध्यमातून केली आहे. सध्या राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय. अश्यात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर निशाणा साधताना दिसत आहेत. यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचं विरोधीपक्षातील म्हणजेच महाविकास आघाडीचे नेते म्हणत आहेत. तर ज्यांची भ्रष्टचार केलाय त्यांना शिक्षा होणारच, असं भाजप आणि शिंदेगटातील नेते म्हणत आहेत. त्यावर चतुर्वेदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राजभवनाकडे निघाला होता मोर्चा आणि जितेंद्र आव्हाडांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

“संजय राऊत लवकरच बाहेर येतील, कायद्याचे राज्य आहे आणि आमचा कायद्यावर विश्वास आहे”

 

Team Global News Marathi: