ईडीचा गैरवापर कुठे झाला ते जाहीर करा, शंभूराज देसाईंचे सुप्रिया सुळेंना खुले आव्हान

 

ईडीचा गैरवापर झाला असता तर राष्ट्रवादीचे दोन नेते तात्काळ जामीनावर तुरुंगातून बाहेर आले असते. न्यायालयाने संबंधितांना जामीन दिला असता. मात्र वर्ष-दीड वर्षे झाले त्यांना जामीन मिळालेला नाही. यावृ ते दोषी असल्याचे जाणवत आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी ईडीने कुठे गैरवापर केला? हे जाहीर करावे, असे थेट आव्हान उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुळेंना दिले आहे.

सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी देसाई यांची निवड झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच जिल्ह्यात येऊन माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सुळे यांनी सध्या राज्यात इडीचा गैरवापर सुरु असल्याचा आरोप केला होता. त्यावर देसाई म्हणाले, इडीचा गैरवापर झाला असता तर राष्ट्रवादीचे दोन नेते त्याचवेळी जामीनावर सुटले असते.

पुढे बोलताना देसाई म्हणाले की, गैरवापर असता तर न्यायालयाने जामीनावर त्यांना तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी जामीन दिला असता. मात्र दीड वर्षे त्यांना जामीन मिळालेला नाही. त्यामुळे सकृतदर्शनी ते दोषी असल्याचे दिसत आहेत. त्यामुळे ईडीचा कुठे गैरवापर झाला हे त्यांनी जाहीर करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी दिले.

शिंदे-फडणवीस सरकार संवेदनशील आहे. कोविडचा एक रुपयाही निधी देण्याचा राहिलेला नाही. काही तांत्रीक प्रस्ताव थांबले आहेत. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना महाविकास आघाडी सरकारपेक्षा पेक्षा जास्त मदत आमच्या सरकारकडून देण्यात आली आहे. विशेष बाब म्हणुन ३३ टक्के पेक्षा कमी नुकसान झालेल्यांनाही मदत देणार आहे.

 

Team Global News Marathi: