नाशिक | भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे नाशिक दौऱ्यावर आलेले असताना आपला किती दिवस मुक्काम असे विचारताच जर कोणाला ईडीने अटक केली तर लगेच तुम्हाला प्रतिक्रिया द्यावी लगे असे खळबळजनक विधान केले होते. आता त्या पाठोपाठ ईडी, सीबीआयच्या रडारवर कोण कोण? याचा खुलासा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
ईडी ही एक स्वायत्त संस्था आहे केंद्राच्या अखत्यारीत काम करते त्यामुळे मी काही जास्त बोलू शकत नाही. मात्र रात्रीतून कुणालाही अटक होऊ शकते, असं खळबळजनक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्यानंतर आता चंद्रकांत पाटील यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
शिवसेनेचे नेते अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर यांच्या बंगल्यांचीही चौकशी सुरू आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनंतर आता एकच खळबळ उडाली आहे. मी कुणाचंही नाव घेतलं नव्हतं. खूप जणांच्या चौकशा सुरू आहेत. त्यातील अनेकांना अटक होण्याची शक्यता आहे.
अजित पवार आणि अनिल परब यांची सीबीआय चौकशी करण्यासाठी काल कोणी तरी कोर्टात गेलतं. नितीन राऊत यांनाही कोर्टाने फटाकरलं आहे. संजय राठोड यांचाही एक मॅटर पेंडिग आहे असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.