मंत्री अनिल परब यांना ईडीने बजावली नोटीस , मंगळवारी ११ वाजता हजर राहण्याची सूचना –

मंत्री अनिल परब यांना ईडीने बजावली नोटीस , मंगळवारी  ११ वाजता हजर राहण्याची सूचना –

मुंबई: राज्याचे परिवहन मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांना सक्तवसुली संचालनालयाने नोटीस पाठवली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या संदर्भात ट्विटरवर ट्विट करुन माहिती दिली आहे.

परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने १०० कोटीच्या कथित वसुलीसंदर्भात ही नोटीस बजावली आहे. ईडीकडुन अनिल परब यांना मंगळवारी, ३१ ऑगस्टला सकाळी ११ वाजता ईडीच्या मुंबईच्या कार्यालयात हजर राहण्याची सूचना देण्यात आले आहे.

मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस धाडल्यानंतर शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी ट्विटद्वारे ही माहिती देत सूचक विधान केले आहे. जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षे प्रमाणे अनिल परब यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली. वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता.

परिवहन मंत्री अनिल परब हे रत्नागिरीचे पालक मंत्री आहेत, असे सांगत कृपया chronology समजून घ्या असे सांगत रत्नागिरीत नारायण राणे यांना अटक केल्यामुळेच ही कारवाई करण्यात आल्याचे सूचक विधान राऊत यांनी केले आहे

ग्लोबल न्युज नेटवर्क: