ईडीने अनिल देशमुखांना दिला आणखी एक झटका, वाढणार अधिक अडचणी

 

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी अधिक वाढताना दिसून येत आहे दोनच दिवसांपूर्वी ईडीने अनेकदा समन्स बजावल्यानंतर अखेर देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले. देशमुखांचा तब्बल 12 तास चौकशी केल्यानंतर अखेर त्यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आली. आता त्या पाठोपाठ देशमुख यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

देशमुखांच्या अटकेनंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. अनिल देशमुख यांचे सुपुत्र ऋषिकेश देशमुख यांनाही ईडीने समन्स बजावले आहेत. ईडीच्या समन्सनूसार ऋषिकेश देशमुख यांना ऐन पाडव्याच्या दिवशी चौकशीसाठी कार्यालयात उपस्थित राहावं लागणार आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांवर खळबळजनक आरोप केले होते.

अनिल देशमुखांनी सचिन वाझेंना १०० कोटी वसुलीचं टार्गेट दिलं असल्याचा आरोप परमबीर सिंगांनी केला होता. या आरोपानंतर अनिल देशमुखांना गृहमंत्री पदाचा राजीनामाही द्यावा लागला होता. न्यायालयाच्या आदेशानूसार ईडी आणि सीबीआय या आरोपांची चौकशी करत आहेत. देशमुखांना 5 वेळा समन्स बजावण्यात आले, त्यांच्या नावाची लूकआउट नोटीस निघाल्यानंतर अखेर अनिल देशमुख समोर आले. त्यांच्या अटकेनंतर त्यांच्या मुलालाही आता समन्स बजावण्यात आलं आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवं वळण लागण्याची शक्यता आहे.

Team Global News Marathi: