टीम इंडियासाठी आज ‘करो या मरो’ सामना क्रिकेट प्रेमींमध्ये वाढली उत्सुकता !

 

टी-२० विश्वचषकात भारतीय संघ स्कॉटलँड संघासोबत पहिल्यांदाच भिडणार आहे. उपांत्य फेरीतील पोहचण्यासाठी भारतीय संघाला हा विजय आत्मसाद करावा लागणार आहे. अफगाणिस्तानचा ६६ धावांनी पराभव केल्यानंतर स्कॉटलँडवरही भारतीय संघ मोठ्या फरकारानं विजय मिळवले अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भारत आणि स्कॉटलँड विश्वचषकातील आपला चौथा सामना खेळण्यासाठी आज मैदानावर उतरणार आहेत. याआधी झालेल्या तीन सामन्यापैकी भारतीय संघाला दोन सामन्यात पराभव तर एका सामन्यात विजय मिळाला आहे. भारतीय संघ गुणतालिकेत सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. तर स्कॉटलँड संघाला अद्याप एकही विजय मिळवता आलेला नाही. तिन्ही सामन्यात त्यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. स्कॉटलँड संघ गुणतालिकेत तळाशी असून उपांत्य फेरीच्या शर्यातीतूनही बाहेर गेला आहे.

भारत स्कॉटलँड संघासोबत पहिल्यांदाच T२० सामना खेळणार आहे. अफगाणिस्तान विरोधातील विजयी भारतीय संघ आज कायम राहण्याची शक्यता आहे. भारताला उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा जिवंत ठेवायच्या असतील तर आज कोणत्याही परिस्थितीत विजयाची नोंद करावी लागेल. भारत आणि स्कॉटलँड यांच्यात होणारा T२० विश्वचषकातील सुपर १२ फेरीतील हा ३७ वा सामना आहे. हा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. सामन्याची नाणेफेक भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.०० वाजता होईल, तर ७:३० वाजता सामना सुरू होईल.

 

Team Global News Marathi: