विहंग सरनाईकांचे भागीदार अमित चंडोल यांना ईडीकडून अटक

विहंग सरनाईकांचे भागीदार अमित चंडोल यांना ईडीकडून अटक

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचनालयाने मंगळवारी सकाळी धाड टाकली होती. आमदार सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापा टाकण्यात आला होता. तसेच त्यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक, विंहग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीचे पथक पोहोचले होते. त्यात विहंग सरनाईक यांना चौकशीसाठी ईडीने ताब्यात घेऊन तब्बल सात तास चौकशी केली होती. बुधवारी सकाळी ११:०० वाजता आमदार सरनाईक यांना ईडीने चौकशीसाठी कार्यालयात बोलावले होते. त्यात आता विहंग सरनाईक यांचे भागीदार अमित चंडोल यांना अटक करण्यात आली आहे.

या कंपनीत आर्थिक गैरव्यवहाराच्या संशयावरुन ईडीने चंडेल यांना अटक केलीय. दरम्यान विहंग सरनाईक यांना देखील ईडीने चौकशीसाठी बोलावलंय. अमित चंडोल आणि विहंग सरनाईक एका कंपनीत पार्टनर आहेत. त्याच कंपननीच्या गैरव्यव्हारावरून अटक करण्यात आली आहे.. या प्रकरणात एका सुरक्षा रक्षक कंपनीचे अमित चंडोल याला काल रात्री उशिरा ईडी ने अटक केली. आमदार प्रताप सरनाईक हे क्वारंटाईन झाले आहेत. आज दुपारी विहंग सरनाईक यांची ईडी कार्यालयात चौकशी होणार आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: