चंगू-मंगूच्या गप्पा गोष्टींमध्ये आम्हाला इंटरेस्ट नाही, राऊत-ठाकरे मुलाखतीवर राणेंचा टोला

चंगू-मंगूच्या गप्पा गोष्टींमध्ये आम्हाला इंटरेस्ट नाही, राऊत-ठाकरे मुलाखतीवर राणेंचा टोला

महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिमानदंन करण्यासाठी सामनाचे कार्यकारी संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचा प्रोमो खासदार संजय राऊत यांनी आपल्या ट्विटवरून रिलीज करत ‘उद्या धमाका’ असे लिहिले आहे.

संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घेतलेल्या मुलाखतीत नेमकं काय असणार, या मुलाखतीत उद्धव ठाकरे काय बोलणार, विरोधकांचा कशा प्रकारे समाचार घेणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात लागलेली आहे. या प्रोमोमध्ये राऊत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काही बोचरे प्रश्न विचारताना दिसत आहे. या प्रश्नांना मुख्यमंत्री कसे सामोरे जातात आणि कशा प्रकारे उत्तर देतात त्याची झलक दिसत आहे. मात्र यावर भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी टीका केली आहे.

निलेश राणे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, “जय मुलाखतीतून आणि ज्या व्यक्तीकडून महाराष्ट्राला काही मिळत नाही अशा फुकट्या लोकांना बघायला आम्हाला काही इंटरेस्ट नाही चांगु मांगूच्या फालतू गप्पा” असे ट्विट करत टोला लगावला आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: