बँक क्षेत्रात सर्वात मोठा घोटाळा गुजरातमध्ये, धक्कादायक माहिती समोर

 

गुजरात | बँकिंग इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा गुजरातमध्ये उघडकीस आला आहे. ABG शिपयार्डने तब्बल २८ बँकांना २२,८४२ कोटी रुपयांचा चुना लावल्याचे समोर आले आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआयने ABG शिपयार्ड आणि त्याचे तत्कालीन अध्यक्ष ऋषी कमलेश अग्रवाल यांच्यासह अन्य ८ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ABG शिपयार्ड ही कंपनी जहाजाची निर्मिती आणि दुरुस्ती करण्याचं काम करते. या कंपनीचे शिपयार्ड गुजरातमधील दहेज आणि सूरत येथे आहेत. ABG शिपयार्ड कंपनीच्या एकूण आठ जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हा घोटाळा आतापर्यंतच्या बँक घोटाळ्यातील सर्वात मोठा असल्याचं बोललं जात आहे. कारण हा घोटाळा नीरव मोदींपेक्षाही मोठा आहे. सीबीआयने दाखल केलेल्या एएफआयआरनुसार, एबीजी शिपयार्ड आणि एबीजी इंटरनेशनल या घोटाळा करणाऱ्या दोन प्रमुख कंपन्या आहेत. या दोन्ही कंपन्या एकाच ग्रुपच्या आहेत.

एएफआयआरनुसार, एबीजी शिपयार्डने एलआयसीची १३६ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. तर एसबीआयला २४६८ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. हा पैसा विदेशात पाठवल्याचा आणि गुंतवणूक केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. नियमांना तोडत एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीला पैसे पाठवले आहेत. एबीजी शिपयार्ड कंपनीने सर्व नियम तोडत अनेक बँकांमध्ये फसवणूक केली आहे.

Team Global News Marathi: