या वेळेत केळी खा आणि आजारांपासून लांब राहा

 

मुंबई | निरोगी शरीरासाठी व्यायाम आणि जेवण या महत्वाच्या गोष्टी आहेत. त्या गोष्टी जर वेळेवरती झाल्या नाहीत तर शरीरावरती त्याचा परिणाम दिसू लागतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची निट काळजी घ्या आणि शरीर निरोगी ठेवा. बऱ्याचदा असे होते की, काम करताना जर कोणाला लवकर थकवा येऊ लागला किंवा दिवसभर थकवा जाणवत असेल तर ही शारीरिक दुर्बलतेची लक्षणे दिसू शकतात.

यासाठी तज्ज्ञ केळी खाण्याचा सल्ला देतात. केळी हे असे फळ आहे, जे तुम्हाला झटपट ऊर्जा देते. याशिवाय अनेक गंभीर आजारांपासूनही ते तुमचे संरक्षण करते. परंतु केळी खाण्याची योग्य वेळ असते का? जर हो तर मग ती कोणती वेळ आहे? या बातमीत केळी खाण्याची पद्धत आणि त्याचे फायदे काय हे जाणून घ्या

केळी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. केळीमध्ये पोटॅशियम असते, ज्यामुळे आपल्या स्नायूंमध्ये क्रॅम्प येत नाही. केळीमध्ये कार्बोहायड्रेट आढळते, जे आपल्या शरीराला ऊर्जा देते आणि आपल्याला कमी थकवा जाणवतो. व्यायामापूर्वी केळी खाल्ल्यास जास्त थकवा जाणवत नाही. तसेच केळ्यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी आणि मॅग्नेशियम आढळतात, याशिवाय व्हिटॅमिन-सी, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन-बी6, थायामिन, रिबोफ्लेविन देखील असतात. केळीमध्ये ६४.३ टक्के पाणी, १.३ टक्के प्रथिने, २४.७ टक्के कार्बोहायड्रेट असतात.

Team Global News Marathi: