भारताचे पराग अग्रवाल ट्विटरचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी –

भारताचे पराग अग्रवाल ट्विटरचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी –

नवी दिल्ली : सोशल मीडियाच्या दुनियेतून मोठी बातमी येत आहे. ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्सी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आता नवीन सीईओ म्हणून भारताचे पराग अग्रवाल हे त्यांची जागा घेतील. जॅक डोर्सी हे त्यांचे उत्तराधिकारी पराग अग्रवाल यांच्याकडे कंपनीची कमान सोपवतील.

ट्विटरने एक पत्र जारी केले आहे. यामध्ये जॅक डोर्सी म्हणाले की, कंपनीत अनेक पदांवर जबाबदारी पार पाडली आहे. पहिल्या सह-संस्थापकापासून ते सीईओची भूमिका बजावली. त्यानंतर अध्यक्षपद भूषवले. यानंतर कार्यकारी अध्यक्ष, अंतरिम सीईओ पद सांभाळले. यानंतर जवळपास १६ वर्षे सीईओ म्हणून काम केले. पण आता मी ठरवले आहे की, कंपनीला अलविदा करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे माझे उत्तराधिकारी म्हणजेच पराग अग्रवाल आता आमचे नवीन सीईओ असतील.

पराग अग्रवाल यांनी आयआयटी मुंबईतून इंजिनीअरिंग केले आहे. यानंतर त्यांनी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्समध्ये पीएचडी केली. ट्विटर कंपनीत येण्यापूर्वी पराग अग्रवाल यांनी मायक्रोसॉफ्ट रिसर्च, याहू रिसर्च आणि एटी अँड टी लॅबमध्येही काम केले आहे. तसेच, ट्विटरमध्ये पराग अग्रवालने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) वापरून युजर्सचे ट्विट वाढवले होते.

दरम्यान, ट्विटरने आपल्या प्रतिस्पर्ध्यांना टक्कर देण्यासाठी गेल्या वर्षभरात अनेक नवनवीन प्रयोग केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, फेसबुक आणि टिकटॉक सारख्या प्रतिस्पर्ध्यांसह बाजारात टिकून राहण्यासाठी आणि २०२३ पर्यंत वार्षिक महसूल दुप्पट करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ट्विटरने अनेक नवीन उपाययोजना केल्या आहेत.

दुसरीकडे, कंपनीने वर्षाच्या सुरुवातीला सांगितले होते की, २०२३ पर्यंत ३१५ डेली अ‍ॅक्टिव्ह युजर करण्याचे लक्ष्य दिले होते. तसेच वार्षिक उत्पन्न दुप्पट करण्याचे आव्हान देखील नव्या सीईओसमोर असणार आहे. तसेच, ट्विटरने आपल्या फीचर्स आणि उपयोगितेत वाढ करण्यासाठी त्यांच्या धोरणात बदल करण्याचे ठरवले आहे. या वर्षीच्या जून महिन्यात ट्विटरने आपल्या डेडिकेटेड टॅबची सुविधा उपलब्ध करुन देऊन आपल्या स्पेस सर्चच्या सुविधेला अधिक सुलभ बनवले होते. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात स्पेसला को-होस्ट करण्यासाठी ऑप्शन उपलब्ध करुन दिला होता.

ग्लोबल न्युज नेटवर्क: