प्रत्येकी कोरोना रुग्णामागे २० ते ३० जनाची तपासणी करा – राजेश टोपे

राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा आपलं डोकं वर काढलं आहे. त्यामुळे राज्य सरकारची डोकेदुखी वाढली आहे. त्यात यवतमाळमध्ये आढळून येत असलेल्या कोरोना रुग्णांमुळे तेथे २८ फेब्रुवारी पर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी काही निर्बंध लावले आहे. त्यातच कोरोना परिस्थितीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भाष्य केले आहे.

कोरोना रुग्ण आढळल्यास प्रत्येक कोरोना रुग्णामागे २० ते ३० जणांची कोरोना तपासणी करण्यात यावी, असे आदेशच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. त्यामुळे आता राज्य सरकार पुन्हा एकदा खबरदारी बाळगत आहे.

सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यांमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण वाढवा. एका रुग्णामागे किमान २० ते ३० निकट सहवासितांची तपासणी करुन चाचण्यांचे प्रमाण वाढवा आणि पॉझिटिव्हिटी दर १०% पेक्षा खाली आणावा, असे निर्देश टोपे यांनी संबंधित जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना दिले आहेत.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून आज तीन ते चार महिन्यांच्या कालावधीनंतर कोरोनाच्या रुग्ण संख्येने ५ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. नागरिकांनी ही बाब गांभिर्याने घेऊन सोशल डिस्टंसिंग,मास्क आणि सॅनिटायजरचा वापराचा अवलंब करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Team Global News Marathi: