भाजपा आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे सूचक विधान “शशिकांत शिंदे आणि मी एकचं”

शशिकांत शिंदे आणि मी एकच आहे. त्यामुळे कुणाला कुणीकडेही जाऊ दे, मात्र गावांचा तालुक्याचा विकास करणे हा एकच आमचा उद्देश आहे. गरज असलेल्या महत्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत. त्यास प्राधान्य दिले जाईल असे विधान भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केले आहे. त्यामुळे शिवेंद्रराजे भोसले लवकरच राष्ट्र्वादीत घरवापसी करतील अशी शक्यता आता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

आमदार शिवेंद्रराजे भोसले लवकरच राष्ट्र्वादीत प्रवेश करतील अशी चर्चा संपूर्ण सातारा जिल्ह्यात होताना दिसत आहे. तसेच शिवेद्रराजेंनी राष्ट्र्वादीत येण्यासाठी यु-टर्न घेतला असल्याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे .

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीआधीच शिवेंद्रसिंहराजे यांची राष्ट्रवादीत घरवापसी होणार असल्याचे बोलले जात आहे. मुंबईतील सरपंच परिषद या संघटना व जावळी तालुक्याच्या वतीने सरपंच व करोना योद्धा म्हणून उल्लेखनीय काम केलेल्या सरपंचांचा मेढा येथे सत्कार करण्यात आला. यावेळी शिवेंद्रसिंहराजे यांनी हे विधान केले होते.

Team Global News Marathi: