चक्क संचारबंदीदरम्यान बँडस्टँडवर फिरत होते टायगर श्रॉफ आणि दिशा पटाणी !

मुंबई : सध्या संपूर्ण राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना आवश्यक बाहेर फिरण्यास मुंबई पोलिसांकडून मज्जाव करण्यात आला आहे. मात्र असे असताना ही अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पटानी काल मुंबईतील बँडस्टँड परिसरात एकत्र फिरताना पोलिसांना आढळून आले होते. हे फिरणे टायगर आणि दिशाला महागात पडले आहे.

टायगर आणि दिशा कारमधून बँडस्टँडवर फिरत असताना मुंबई पोलिसांनी त्यांना रोखले. त्यामुळे पोलिसांची ही कारवाई चर्चेचा विषय ठरली आहे. ई-टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार मंगळवारी संध्याकाळी दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ हे जिममधून परतत होते. त्याचदरम्यान दोघेही फिरण्यासाठी मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या बँडस्टँड येते पोहोचले. येथे ते कारमधून दुसरी फेरी मारत असतानाच पोलिसांनी अचानक त्यांना रोखले. यावेळी टायगर श्रॉफ मागच्या बाजूला तर दिशा पुढे बसली होती.

त्यानंतर पोलिसांनी दोघांचेही आधारकार्ड तपासले. तसेच अन्य औपचारिकता पूर्ण केल्यानंतर त्यांना सोडून दिले. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे टायगर श्रॉफ आणि दिशा पटाणीवर ही कारवाई केली गेली. टायगर श्रॉफ आमि दिशा पटानी यांनी बागी-२ आणि बागी-३ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्याशिवाय एका म्युझिक व्हिडीओमध्येही ते एकत्र दिसले आहेत. तसेच हल्लीच ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या सलमान खानच्या राधे या चित्रपटामध्येही दिशा दिसली होती.

Team Global News Marathi: