आंदोलना दरम्यान मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी केली पोलिसांना धक्काबुक्की !

देशातील वाढत्या इंधन दरवाढ विरोधात मुंबई काँग्रेसच्या वतीने आंदोलहकनी हाक देण्यात आली होती. त्यामुळे इंधन दरवाढीच्या निषेधार्थ शनिवारी मुंबई काँग्रेसने शनिवारी ठिकठिकाणी आंदोलन केले गेले. यावेळी गोरेगाव येथील आंदोलनादरम्यान मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांचा पोलिसांशी वाद झाला आणि त्यांनी उपस्थित काॅन्स्टेबलला धक्का मारल्याचा व्हिडिओ रविवारी व्हायरल झाला आहे. हा विडिओ व्हायरल होताच भाई जगताप यांच्यावर जोरदार टीका होताना दिसत आहे.

गोरेगाव येथे काँग्रेसचे आंदोलन सुरू असताना घटनास्थळी असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलकांना थांबण्याच्या सूचना केल्या. त्याला भाई जगताप यांनी हरकत घेतली. आंदोलन बंद करा, असे सांगत असाल, तर आम्ही ऐकणार नाही. आंदोलन संध्याकाळपर्यंत सुरू राहील, असे म्हणत त्यांनी पोलिसांशी वाद घालायला सुरवात केली. दरम्यान, एक काॅन्स्टेबल पुढे सरकत असताना जगताप यांनी त्याला मागे सारले. त्यानंतर त्यांच्यासोबतच्या आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. या सर्व प्रकरणाचा व्हिडीओ रविवारी व्हायरल झाला.

या व्हायरल झालेल्या व्हिडिओत काँग्रेसकडून सुरू असलेल्या आंदोलनात भाई जगताप हेही सहभागी झाले. आंदोलनावेळी काही पोलीस घटनास्थळी येतात. आंदोलकांना सूचना देत असताना, जगताप हे पोलिसांना आरे-तुरेची भाषा वापरताना दिसतात. यावेळी पोलीस आणि त्यांच्यात बाचाबाची झालेली पाहावयास मिळत आहे. तसेच एका पोलिसाला ते ढकलतानाही दिसून आले. या आंदोलनात अनेकजण विनामास्क होते. अशात कोरोना नियमांचे उल्लंघन करीत आंदोलन केल्याप्रकरणी जगताप यांच्यासह ५० कार्यकर्त्यांविरुद्ध १८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

Team Global News Marathi: