दौंडची आवक वाढल्याने उजनीची वाटचाल टक्केवारीच्या पंच्याहत्तरीकडे ; सकाळी आठ वाजता +71 टक्के

पंढरपूर – सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणाच्या पाणी पातळीत शनिवारी झपाट्याने वाढ होताना दिसेल. खडकवासला व मुळशी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे सकाळी आठ वाजता दौंडची आवक ३० हजार क्युसेकहून अधिक झाली होती. उजनी 71 टक्के उपयुक्त पातळीत भरले आहे. पाण्याची आवक पाहता ते टक्केवारीची पंच्याहत्तरी येत्या चोवीस तासात गाठेल.

दौंडची आवक 1076 क्युसेक म्हणजेच जवळपास 37 हजार क्युसेकपर्यंत पोहोचली होती. पुणे बंडगार्डनचा विसर्ग 26 हजार क्युसेक आहे. खडकवासला धरणातून सोडण्यात येणारे पाणी कमी झाले असून ते 9358 क्युसेक तर मुळशी धरणातून 3 हजार क्युसेक पाणी सोडले जात आहे.

नोकरी गेलेल्या बेरोजगारांना मिळणार तीन महिन्याचा पगार, मोदी सरकारचा निर्णय

काल या दोन प्रकल्पातून मोठ्याप्रमाणात विसर्ग झाले आहेत. यामुळे दौंडची आवक आज वाढली आहे भीमा खोर्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने यंदा उजनी हळूहळू भरत आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: