सत्ता नसल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे नेते झाले आहेत ‘कासावीस’ – राजू शेट्टी

 

मुंबई | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली होती. त्यातच आता राज्यपाल नियुक्ती १२ आमदारांच्या मुद्दयावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि आघाडी सरकार यांच्यामध्ये वाद झालेले पाहायला मिळत आहे, याच मुद्द्यावरून आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी राज्यपालांना जोरदार टोला लगावला आहे.

राज्यपाल महोदय कामात असतात, त्यामुळे त्यांना विधानपरिषदेच्या नियुक्त १२ आमदारांच्या पत्रावर स्वाक्षरी करायला वेळ नसेल अशा कडवट शब्दात शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे. राज्य सरकारने विधानपरिषदेवर नियुक्त करायच्या १२ सदस्यांची यादी दिली आहे. यामध्ये राजू शेट्टी यांचे नाव असल्याची चर्चा आहे. परंतु मागील अनेक महिन्यांपासून यादी राज्यपालांकडे पडून आहे. त्यावर अद्याप राज्यपालांनी स्वाक्षरी केली नाही. यासंदर्भात बोलताना राजू शेट्टी यांनी राज्यपालांवर टीका केली.

राजू शेट्टी बुधवारी पुण्यात आले होते. त्यांनी साखर आयुक्तांबरोबर भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर देखील टीका केली. ज्यांनी जात काढली त्यांच्याबरोबर शेट्टी जातात या भाजपच्या टिकेला प्रत्युत्तर देताना ते म्हणाले, सत्ता नसल्याने भाजपचे सगळे नेते कासाविस झाले आहेत. त्यांनी कोणाकोणाची जात काढली ते राज्याला माहिती आहे. त्यामुळे त्यांनी मला शहाणपणा शिकवू नये असा टोला त्यांनीभाजपाला लगावला आहे,

Team Global News Marathi: