इंधन दरवाढीमुळे पूर्वी आंदोलने करणारे सत्ताधारी आज मात्र मूग गिळून गप्प

 

राज्यात एकीकडे कोरोनाच्या संसर्गामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्यामुळे आज बेरोजगारीमुळे उपासमारीची वेळ आलेली असताना त्यात दुसरीकडे वाढत्या इंधनदरवाढीमुळे सामान्य व्यक्ती हतबल झाला आहे. या वाढत्या इंधनदरवाढीमुळे सामान्य नागरिकांच्या घराचे बजेट बिघडताना दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. ‘पूर्वी थोडे जरी दर वाढले तरी सत्ताधारी पक्षाचे लोक मोर्चा, आंदोलने करीत होते. पण आज मात्र तेच मूग गिळून गप्प आहेत,’ अशी टीका पाटील यांनी केली आहे.

सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील उपस्थित होते. यावेळी पाटील म्हणाले की, आज इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. पूर्वी थोडे जरी दर वाढले तरी सत्ताधारी पक्षाचे लोक मोर्चा, आंदोलने करीत होते पण आज मात्र ते मूग गिळून गप्प आहेत.

तसेच सर्वत्र स्वतःचे फोटो प्रकाशित करून मोफत लस उपलब्ध करून दिल्याचा केंद्र सरकारने आव आणला. मात्र इंधनावर अधिक टॅक्स लावून जनतेकडून पैसे उकळल्याची बतावणी स्वतः केंद्रीय पेट्रोलियम राज्यमंत्रीच करतात. हा भाजपचा खरा चेहरा आहे अशी टीका जयंत पाटील यांनी केली होती.

 

Team Global News Marathi: