पंतप्रधान मोदी यांच्याकडून देशवासीयांना ईदच्या सदिच्छा

 

नवी दिल्ली | मुस्लिम धर्मात ईद मिलाद उन-नबी या उत्सवाचं इस्लाम धर्मात मोठं महत्त्व आहे. हा सण ईद-ए-मिलाद किंवा मालविद या नावानं देखील ओळखला जातो. फक्त भारतातच नाही तर जगभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणानिमित्ताने अनेकांनी मुस्लिमधर्मीयांना सदिच्छा दिल्या आहेत. मात्र यंदा कोरोनाच्या नियमांचे पालन करून हा सण साजरा करण्याचे आव्हान करण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटल की, मिलाद-उन-नबीच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वत्र शांतता आणि समृद्धी असावी, अशा सदिच्छा. दयाळूपणा आणि बंधुत्वाचे मूल्य सदैव विजयी होवोत. ईद मुबारक! असे ट्विट त्यांनी केले आहे.

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील ईदच्या सदिच्छा दिल्या आहेत. त्यांनी म्हटलंय की, पैंगबर मुहम्मद यांच्या जन्मदिनी, म्हणजेच ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या या पावन दिवशी, मी सर्व देशवासीयांना, खासकरुन मुस्लिम बंधु-भगिनींना शुभेच्छा देतो. चला, आपण सगळे पैंगबर मुहम्मद यांच्या आयुष्यामधून प्रेरणा घेऊन, समाजाच्या सुख-शांतीसाठी काम करुया.

 

Team Global News Marathi: