दृश्यम २ १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होताच अजयनं घेतलं काशी विश्वनाथाचं दर्शन

 

अजय देवगण दृश्यम 2 चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत असून वर्ष संपण्यापूर्वी अजयने चित्रपट रसिकांना एक मोठी ट्रीट दिली आहे. दृश्यम 2 हिट झाला, आता अजय देवगण कामावर परतला आहे. त्याने त्याच्या नवीन चित्रपटावर काम सुरू केले आहे. ज्याच्या शूटिंगसाठी तो वाराणसीला पोहोचला. वाराणसीला पोहोचल्यावर अजय देवगण सर्वात आधी चेत सिंह घाट येथील शूटिंग स्पॉटवर गेला. सायंकाळपूर्वी अजय देवगणने काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.

गंगेच्या लाटांवर स्वार होऊन अजय बोटीने गंगा घाटाच्या काठी काशी विश्वनाथच्या गंगद्वारला गेला आणि बाबा विश्वनाथांचे विधिवत दर्शन व पूजा केली. दर्शनाहून परतत असताना अजयच्या चाहत्यांनी त्याला घेरले.यावेळी अजय देवगणला विचारण्यात आले की, मंदिरात आल्यानंतर कसे वाटले?, यावर अभिनेता म्हणाला, जसं सगळ्यांना वाटतं तसंच वाटतंय. अजय देवगणने हर हर महादेव म्हटलं. यानंतर अजय देवगण काशी विश्वनाथच्या गंगद्वारहून गंगा घाटातून बोटीने परतला. अजय देवगणच्या या दौऱ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या फोटोंमध्ये अजय देवगणने कपाळावर चंदन आणि हात जोडताना दिसत होता. अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुरत दिसत होते. प्रत्येकजण अजय देवगणला आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात घेण्यासाठी उत्सुक होतं. अजय देवगण कोणत्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी बनारसमध्ये पोहोचला होता, याबाबत आता कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Team Global News Marathi: