अजितदादा म्हणतायत कामाख्या देवीला कोणाचा बळी देणार ? तर दीपक केसरकर म्हणतायत की,

 

राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे गटाचे आमदार आज कुटुंबासह गुवाहाटीमध्ये दाखल होणार आहेत. गुवाहाटी येथील कामाख्या मातेच्या मंदिरात हे आमदार जाणार असून तिथे पूजा करणार आहेत. विरोधकांकडून या दौऱ्यावर टीका करण्यात येत आहेत. गुवाहाटीमधील कामाख्या मंदिराला कोणाचा बळी देणार, असा उपरोधिक प्रश्न विरोधकांनी उपस्थित केल्यानंतर शिंदे गटाने याला प्रत्त्युत्तर दिले आहे.

शिंदे गटाचे प्रवक्ते आणि राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी यावर भाष्य करताना आम्ही बळी देणार असल्याचे सांगितले. महाराष्ट्राच्या विकासविरोधी विचारांचा बळी देणार असल्याचे केसरकर यांनी म्हटले. कामाख्या देवीच्या दर्शनाला जात आहोत, हे महाराष्ट्राच्या विकासासाठी आशिर्वाद मागण्यासाठी जात असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

मात्र, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कोणाचा बळी देणार असा प्रश्न केला होता. महाराष्ट्राच्या विकासाच्या आड येणाऱ्या विचारांचा बळी घ्यावा असे कामाख्या देवीला साकडं घालणार आहोत, असे दीपक केसरकर यांनी म्हटले. राज्यावरील संकटे दूर करावीत, नैसर्गिक आपत्ती, वादळे, महासाथीच्या आजारासारखे अरिष्ट दूर करावे, या अरिष्टांचा बळी घ्यावा, अशी प्रार्थना करणार असल्याचे केसरकर यांनी म्हटले. राज्यातील जनतेला सुखी करावे, राज्याचा विकास व्हावा यासाठी देवीला साकडं घालणार असल्याचे केसरकर यांनी म्हटले.

Team Global News Marathi: