ड्रग्स सेवन प्रकरणी अभिनेत्री राकुल प्रीत सिंग हिच्या अडचणी वाढणार

 

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत अथमहत्या प्रकरणानंतर मुंबई अनेक अभिनेते आणि अभिनेत्रीची चौकशी करण्यात आली होती. तसेच काहींना ड्रग्स बाळगल्याप्रकरणी अटक सुद्धा करण्यात आली होती. आता त्या पाठोपाठ अंमली पदार्थ सेवन प्रकरणी अभिनेत्री राकुल प्रीत सिंग ही सक्तवसुली संचालनालयाच्या कार्यालयात दाखल झाली आहे. काही दिवसांपूर्वी तिच्यासह १२ सेलिब्रिटींना समन्स बजावले होते.

सदर प्रकरण सुमारे चार वर्षं जुनं आहे. अंमली पदार्थांची तस्करी आणि सेवन केल्याचा गुन्हा तेलंगणा उत्पादन शुल्क विभागाने नोंदवला होता. त्याची चौकशी करण्यासाठी राकुल प्रीत सिंग, राणा दग्गुबाती, रवी तेजा आणि दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांसारख्या १२ जणांना ईडीचे समन्स बजावण्यात आले होते. त्यानुसार त्यांना वेगवेगळ्या दिवशी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. आलेल्या समन्सनुसार राकुल प्रीत सिंग ईडी कार्यालयात दाखल झाली आहे.

चार वर्षांपूर्वी जेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं तेव्हा सुमारे आठ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं, मुख्यतः ड्रग तस्कर. त्यापैकी बहुतेक कमी दर्जाचे अंमली पदार्थ तस्कर होते. या प्रकरणाची चौकशी सुरू असताना काही सेलिब्रिटींच्या दिशेने संशयाची सुई होती. त्यानुसार समन्स धाडण्यात आले.

 

Team Global News Marathi: