विधानपरिषद पोटनिवडणूकीसाठी संजय केनेकर विरूद्ध डॉ. प्रज्ञा सातव यांच्यात लढत

विधानपरिषद पोटनिवडणूकीसाठी संजय केनेकर विरूद्ध डॉ. प्रज्ञा सातव यांच्यात लढत

मुंबई । काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या एका जागेसाठी येत्या २९ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होत असून, या निवडणूकीत भाजपचे उमेदवार संजय केनेकर विरूद्ध काँग्रेसच्या उमेदवार डॉ. प्रज्ञा सातव यांच्यात लढत होणार आहे.दोन्ही उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी येत्या २९ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होत असून भाजपने औरंगाबादचे शहराध्यक्ष संजय केनेकर यांना तर काँग्रेसने दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली आहे.

सोमवारी भाजपचे उमेदवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आदी भाजपचे नेते उपस्थित होते.काँग्रेसने डॉ. प्रज्ञा सातव यांच्या नावाची आज घोषणा केली आहे.त्यानी आज ( मंगळवारी ) उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते.

या निवडणूकीसाठी गुप्त पद्धतीने मतदान होणार आहे.काँग्रेसच्या उमेदवार डॉ. प्रज्ञा सातव यांना शिवसेना आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा असल्याने या निवडणूकीत भाजप चमत्कार करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले असले तरी या पोटनिवडणूकीत महाविकास आघाडीचा उमेदवार बाजी मारण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडून येणा-या उमेदवाराचा कालावधी हा जुलै २०२४ पर्यंत असणार आहे.

महाविकास आघाडीला १७० आमदारांचा पाठिंबा आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत १६९ मते आघाडीला मिळाली होती. राज्यसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून काँग्रेस नेत्यांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घ्यावी लागली होती.पक्षीय बलाबल पाहता महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. प्रज्ञा सातव सहजपणे बाजी मारतील, अशी शक्यता आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: