१०० दिवस खोलीत बंद करून राज कुंद्राला तुडवा, सुनील पालच्या कमेंटने घेतले साऱ्यांचे लक्ष वेधून !

 

मुंबई | उद्योगपती राज कुंद्रा याला पॉर्नोग्राफी प्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. राज हॉटशॉट नामक एका अॅपसाठी पॉर्नपटांची निर्मिती करत असल्याची माहिती समोर आहे. या प्रकरणावरून राज कुंद्राला काही कलाकारांनी पाठिंबा दिला आहे तर काहींनी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या प्रकरणावरून प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन, अभिनेता सुनिल पाल याने प्रतिक्रिया दिली आहे. अशा वेब सीरिज बनवणाऱ्यांना एका खुलीत बंद करून चांगलाच चोप द्या असा सल्ला त्याने पोलिसांना दिली आहे. “चांगल्या चित्रपटांना प्रेक्षक नाही अन् असे व्हिडीओ पाहण्यासाठी लोक हजारो रूपये खर्च करतात. वेब सीरिजच्या नावाखाली पॉर्नपटांचा व्यवसाय सुरु आहे.

सेन्सरशीप नसल्याचा गैरफायदा घेत ही मंडळी समाजात अश्लीलता पसरवत आहेत. अशा लोकांना एका खोलीत बंद करा आणि १०० दिवस आधी चांगला चोप द्या. मग त्यांच्यावर इतरत्र कारवाई करा. हे लोक कोट्यवधी रुपयांची कमाई करतात अन् विदेशात पळतात. परंतु आपली तरूण पिढी मात्र या लोकांमुळे वाया जात आहे. त्यांना चांगले चित्रपट म्हणजे काय? साहित्य म्हणजे काय? उत्तम अभिनय म्हणजे काय असतो? हे देखील कळत नाही. दोर चार अश्लील दृश्य पाहण्यासाठी ते हजारोंचे सबस्क्रिप्शन घेतात. हे त्वरित थांबवायला हवं. राज कुंद्राच्या अटकेमुळे या सर्वांना चांगला चाप बसेल अशी अपेक्षा आहे अशी प्रतिक्रिया सुनिल पालने दिली आहे.

Team Global News Marathi: