वजन वाढू द्यायचं नाही ना ? मग रात्रीच्या जेवणात हे बदल आवर्जून करा

आजच्या धकाधकीच्या जीवनात वाढतं वजन ही अनेकांसाठी मोठी समस्या असते. त्यासाठी ते वेगवेगळ्या डाएटचा आधार घेतात. या डाएटमध्ये बऱ्याचदा सकाळचा नाश्ता आणि दुपारच्या जेवणावर लक्ष केंद्रित केललं असतं. पण, रात्रीच्या जेवणावर मात्र विशेष लक्ष दिलं जात नाही. मात्र, रात्रीच्या जेवणातही तुम्ही काही बदल करून वजन घटवू शकता.

 

काय कराल?

प्लान बनवा- ज्या प्रमाणे तुम्ही दिवसातल्या खाण्याचा प्लान बनवता त्याचप्रमाणे तुम्ही रात्रीच्या जेवणाचंही प्लानिंग करा. त्यामुळे रात्रीच्या वेळी पोटात जाणारं अतिरिक्त अन्न कमी होईल. रात्रीच्या जेवणात शक्यतो प्रथिने, शरीराला उपयुक्त इतक्याच प्रमाणात फॅट्स आणि पिष्टमय पदार्थांचा समावेश करा.

‘मोकळं आभाळ’ पती-पत्नी मधील संवाद कसा असावा..!

घरात नेहमी खाण्याचे जिन्नस भरून ठेवा. आठवड्याच्या हिशोबाने नीट आखून जिन्नस आणा. हे सर्व जिन्नस पौष्टिक असतील याची काळजी घ्या. बऱ्याचदा आपण एखादा पदार्थ खाण्याचा बेत आखतो. पण त्यासाठी लागणारे जिन्नस नसल्याने आपण दुसरा एखादा आरोग्यासाठी उपयुक्त नसलेला पदार्थ खातो. त्यामुळे हे कटाक्षाने पाळा.

रात्रीच्या जेवणाआधी काही काळ अजिबात खाऊ नका. बऱ्याच लोकांना संध्याकाळी खायची सवय असते. संध्याकाळी खूप खाणं झाल्यामुळे रात्रीचं जेवण नीट जात नाही आणि झोपेच्या वेळांमध्ये भूक लागते. त्यामुळे दुपारच्या जेवणानंतर मधल्या नाश्त्यात फळे, सुकामेवा किंवा योगर्ट असे पदार्थ खा. जेणेकरून अतिरिक्त अन्नसेवनाची सवय लागणार नाही.

जो पदार्थ आवडतो, तो पदार्थ जेवणात अवश्य समाविष्ट करा. उदा. बटाटा किंवा चीज. पण या पदार्थांचं प्रमाण अत्यंत कमी ठेवा. जेणेकरून तुमची इच्छाही पूर्ण होईल आणि वजन वाढणार नाही.

दिवसातून कमीत कमी एकदा तरी किमान कुटुंबासोबत भोजन करा. कुटुंबासोबत आनंदाने भोजन केल्याने ताण कमी होतो आणि अन्नपचनही सुलभ होतं. शक्यतो रात्रीच्या वेळी कुटुंबासोबत अन्नसेवन करा. त्यामुळे दिवसभराचा थकवा, ताण, चिंता कमी होऊ शकेल.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: