कर्नाटकच्या नवीन मुख्यमंत्रीपदी बसवराज बोम्माईंची निवड!

 

कर्नाटक | भाजपचे जेष्ठ नेते आणि मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी सोमवारी राजीनामा दिला त्यानंतर आता कर्नाटकात मोठी खळबळ उडाली होती. येडियुरप्पां यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे दिला. त्यानंतर त्यांचा राजीनामा राज्यपालांनी मंजुर देखील केला आहे.

बीएस येडियुरप्पा मुख्यमंत्री पदावरुन राजीनामा दिल्यानंतर त्यांची कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदी बसवराज बोम्माईं यांची वर्णी लागली आहे. ते कर्नाटकचे २० वे मुख्यमंत्री ठरले आहेत. बोम्मई हे गृहमंत्री होते. पुढचे मुख्यमंत्री तुम्ही असणार का? या प्रश्नावर त्यांनी दोनच दिवसांपूर्वी नकारात्मक उत्तर दिलं होतं. मात्र, आता त्यांचीच मुख्यमंत्री पदी निवड करण्यात आली आहे.

बसवराज बोम्मई यांची कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदासाठी निवड झाली आहे. नवीन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे बीएस येदियुरप्पा यांच्या जवळचे मानले जातात. येदियुरप्पा यांच्या नंतर बसवराज बोम्मई हे लिंगायत समुदायातील मोठे नेते मानले जातात. त्यांच्या निवडीनंतर लिंगायत समुदायाचा असंतोष कमी होईल.. दुसरी बाब म्हणजे ते संघ परिवाराशी संबंधी आहे.

बोम्मई हे येडीयुराप्पा सरकारमध्ये गृहमंत्री होते. खाण मंत्री मुरगेश निरानी, गृह मंत्री बसवराज बोमाई, उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी आणि चौथे बसवंगौड़ा पाटील यतनाल यांची नावे चर्चेत होती. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचे यांचेही नाव चर्चेत आले होते. दिल्लीत येडीयुराप्पा यांनी माझ्या मर्जीतला नेताच मुख्यमंत्री करावा अशी अट घातली होती. यानुसार भाजपाने सुवर्णमध्य साधत बोम्मई यांना मुख्यमंत्री पद दिले आहे.

Team Global News Marathi: