इतिहासात तुमची नोंद ही पवार कुटुंबाचा लोमत्या अशीच होणार-निलेश राणेंचा पलटवार

जयंत पाटलांचे काय गंजलेले आहे ते बोलायला लावू नका – निलेश राणे

ग्लोबल न्युज: सरकार यशस्वीपणे काम करत आहे. ते सक्षम आहे. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे हे सरकारवर आरोप करत सुटले आहे. फडणवीसांना विरोधी पक्ष नेतेपदाचा अनुभव कमी आहे. त्यामुळे त्यांचा त्रागा सुरू आहे, तर नारायण राणे हे गंजलेली तोफ आहे. त्याच्यामधून आलेल्या गोळ्यांना आम्ही अन् मातोश्रीही महत्त्व देत नाही अशा शब्दात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी अकोल्यात बोलताना टीका केली होती.

आता मंत्री जयंत पाटील यांच्या या टीकेला भाजपा नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी प्रतिउत्तर दिले आहे. “राष्ट्रवादीचे इस्लामपूर मतदारसंघ मर्यादित नेते जयंत पाटीलाना स्वतःला सगळं समजतं असा गैरसमज आहे.

गंजलेल्या तोफा दुरुस्त होतात पण गंजलेले विचार दुरुस्त होत नाही. पाटील साहेब इतिहासात तुमची नोंद ही पवार कुटुंबाचा लोमत्या अशीच होणार. तुमचं काय काय गांजलेल आहे बोलायला लावू नका” असा टोला निलेश राणे यांनी जयंत पाटलांना लगावला होता.

ग्लोबल न्युज नेटवर्क: