पंतप्रधान मोदींनी एकाच दिवशी घेतला तीन स्वदेशी कोरोना लस निर्मिती प्रक्रियेचा आढावा

 ग्लोबल न्यूज:कोरोनावर प्रभावी लस  विकसित करण्याचे काम संपूर्ण जगभरात सुरू आहे. भारतातही लस विकसित करण्याचे काम सुरू असून ही लस लवकरात लवकर उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भारतात कोरोना लस निर्मिती सुरू असलेल्या सुविधा केंद्रांना पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट देऊन कोरोना लस निर्मिती प्रक्रियेतील प्रगती, तयारी आणि अडथळ्यांची माहिती घेतली आहे.

गुजरातमधील अहमदाबाद येथील झायडस बायोटेक पार्क आणि हैदराबाद येथील भारत बायोटेक पार्कला भेट दिल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात दाखल झाले. त्यानंतर हेलिकॉप्टरने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सीरम इन्स्टिट्यूटमध्ये पोहोचले. सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तासभर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस संदर्भातील माहिती आणि आढावा घेतला.सायरस आणि आदर पुनवाला यांनी लसीच्या सर्व प्रक्रियेची माहिती दिली.

सीरममध्ये कोविशिल्ड लस निर्मिती

कोविड-१९वर प्रभावी लस निर्मितीचे काम ऑक्सफर्ड विद्यापीठासोबत औषध निर्माता कंपनी अॅस्ट्राझेंका (Astrazeneca) आणि पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया संयुक्तपणे काम करत आहेत. या कोरोनावरील लसीचे नाव कोविशिल्ड (Covishield) असे आहे.

हैदराबादमधील भारत बायोटेकमध्ये कोव्हॅक्सिन लसीवर संशोधन

भारत बायोटेक (Bharat Biotech), आयसीएमआर आणि एनआयव्ही (National Institute of Virology) संयुक्तपणे कोव्हॅक्सिन या लसीवर संशोधन करत आहेत.

अहमदाबादमध्ये झायकोविड लसीवर संशोधन

झायडस कॅडिला (Zydus Cadila) ही कंपनी झायकोविड (ZyCoV-D) या लसीची निर्मिती करत आहे. या लसीचे दुसऱ्या टप्प्यातील माणसांवरचे क्लिनिकल ट्रायल प्रगतीपथावर आहे. झायडस कॅडिलामध्ये डीएनएवर आधारित स्वदेशी लस विकसित केली जात आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: