सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अद्याप अनेक गोष्टींवर निर्बंध लादलेले असताना दुसरीकडे मात्र मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बार व्यावसायिकांकडून कोरोनाचे नियम सर्रासपणे धाब्यावर बसविले जात आहेत. सोशल डिस्टन्स पाळले जात नसताना महिलांचा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तोकडे कपडे घालून आकर्षित करणे सुरूच असल्याचे पुन्हा एकदा कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या कारवाईतून उघड झाले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार शुक्रवारी मोनालिसा बारमध्ये कोरोनाचे नियम धाब्यावर बसविले गेले असताना पुन:श्च या हद्दीतीलच ‘लोटस’ या लेडीज सर्विस बारवर टाकलेल्या धाडीत त्याठिकाणी महिला विनामास्क होत्या तसेच तोकडया कपडयात ग्राहकांशी अश्लील कृती व हावभाव करताना निदर्शनास आल्या. बुधवारी केलेल्या या कारवाईत ४१ जणांना ताब्यात घेऊन पुढील कारवाई करीता स्थानिक मानपाडा पोलिसांच्या हवाली केले आहे.
हा बार डोंबिवली पुर्वेकडील कल्याण-मानपाडा रोडवर आहे. या ठिकाणी कोरोनाचे नियमांचे उल्लंघन करून गाण्यांवर चाललेल्या महिलांच्या अश्लील हावभाव आणि कृत्याची माहीती गुन्हे अन्वेषण विभागाचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक विलास पाटील यांना गुप्त बातमीदारमार्फत मिळाली. संबंधित बार व्यावसायिकाकडे परवाना नसतानाही त्याठिकाणी लेडीज सव्र्हीस देवून ग्राहकांना आकर्षित करणोकरीता महिलांना तोकडे कपडे परिधान करण्यास लावून हावभाव करून अश्लील कृत्य करीत आहेत. तेथील महिलांच्या तोंडावर मास्क ही नव्हते तर सोशन डिस्टन्सचा फज्जा देखील उडाला होता.