“मनसेकडून अमोल मिटकरींना श्वान आणि बिस्किट भेट”

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जातीय द्वेषाला राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदार धरल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं होत. त्यामुळे मनसे कार्यकर्ते संतापले आहेत. मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरींना श्वान आणि बिस्किट दिलं असून आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

राज ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे नाशिकचे मनसे कार्यकर्ते संतापले आहेत. मनसेने अमोल मिटकरींना श्वान आणि बिस्कीट भेट दिले. तसेच मिटकरीं विरोधात जोरदार मनसैनिकांनी घोषणाबाजीही केली. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी मनसे काय आहे हे नाशिकचे मनसैनिक दाखवून देतील असा इशाराही दिला आहे. त्यामुळं एयणाऱ्या दिवसात मसने आणि राष्ट्रवादी पक्षातील वाद आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तसेच मनसेचे पुणे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे विभाग प्रमुख जगदीश खांडेकर यांनी मिटकरी यांना थेट गाडी फोडण्याची धमकी दिली आहे. मंत्रालयात जाताना गाडीच्या काचा काळ्या करा, अन्यथा गाडीत दिसल्यास मिटकरींना फोडू, अशी खुली धमकी खांडेकर यांनी दिली आहे. यावर अद्याप राष्ट्र्वादीने प्रतिक्रिया दिलेली नाही.

Team Global News Marathi: